वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी चिमूर तालुक्यातील महादवाडी मोटेगाव शेतशिवारातील घटना

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी चिमूर तालुक्यातील महादवाडी मोटेगाव शेतशिवारातील घटना


प्रतिनिधी

प्रवीण वाघे 

चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या महादवाडी मोटेगाव शेत शिवारात आज सकाळी 8:30 वाजता च्या सुमारास दबा धरून बसलेल्या एका पट्टेदार वाघाने हमला करून शेतावर जात असलेल्या शेतकऱ्याला गंभीर जखमी केले यात ते थोडक्यात बचावले आरडाओरडा केल्यामुळे या शिवारात शेतावर असलेल्या शेतकरीवर्ग धावले त्यामुळे वाघाने त्यांना सोडले आणि जंगलाच्या दिशेने धूम ठोकली सदर महादवाडी येथील शेतकरी उत्तम मुकाजी कोरांगे वय 40 वर्षे हे नेहमीप्रमाणे आज सकाळी शेतावर जाण्यास निघाले असता मांगली रीठ शेतशिवारा च्या समोर वृषभ  कामडी यांच्या शेताजवळ पोहताच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक कोरांगे यांच्यावर हल्ला चढविला वाघाला पाहताच त्यांनी आरडाओरडा करीत पळण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाघाने त्यांना पकडले परंतु त्यांच्या ओरडण्यामुळे या परिसरातील शेतीवर असलेल्या शेतकऱ्यांनी वाघाच्या दिशेने धूम ठोकली दहा बारा शेतकरी धावत येताना पाहताच वाघाने कोरांगे याना सोडले आणि जगलाच्या दिशेने धूम ठोकली यात कोरांगे हे गंभीर जखमी झाले त्यांना हाताला आणि पाठीला गंभीर जखमा असून रक्तस्त्राव खूप झाल्याने त्यांना तात्काळ नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले गंभीर असल्याने  त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले प्राथमिक उपचारा नंतर प्रकृती खालावल्याने त्यांना चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. 

या परिसरात नेहमीच वाघाची दहशत असून नेहमीच वावर आहे मागील काही महिन्यांपूर्वी याच मांगली रिठ परिसरातील हरणी येथील शेतकरी  शामराव ननावरे याना शेतात काम करीत असताना ठार केले  आणि ही दुसरी घटना असल्याने या परिसरात शेतीवर जाण्यासाठी शेतकरी घाबरत असून मोठी दहशत निर्माण झाली  आहे या परिसरात नेहमीच वाघाचे वावर आहे आतापर्यंत या वाघाने अनेक जनावरांना ठार केले आहे तसेच मोटेगाव येथे गावात सुद्धा रात्रौला येऊन जातो कधी कधी तर गोट्यातील जनावरे ठार करून ओडून नेतो यामुळे मोटेगाव आणि परिसरात खूप मोठी दहशत निर्माण झाली आहे रात्रौला कुणीही घराबाहेर जात नाही तेव्हा या वाघाचे बंदोबस्त करून वाघाला या परिसरातून हाकलावे किंवा जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या कोरांगेला आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler