गोंडवाना विद्यापीठात लोकमान्य महाविद्यालय वरोरा ने रोवले मानाचे स्थान

गोंडवाना विद्यापीठात लोकमान्य महाविद्यालय वरोरा ने रोवले मानाचे स्थान

वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058


वरोरा येथील स्थानिक लोकमान्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. भारती बंडू पाटील हिने गोंडवाना विद्यापीठाच्या सत्र 2020-21 च्या इंग्रजी विषयाच्या (एम. ए.) गुणवत्ता यादीत पाचवे स्थान पटकाऊन लोकमान्य महाविद्यालयाचे नाव गोंडवाना विद्यापीठात रोवले आहे. विशेष बाब म्हणजे मागील सलग सहा वर्षापासून गोंडवाना विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या (एम. ए.) गुणवत्ता यादीत महाविद्यालयाचे विद्यार्थी स्थान मिळवत आहेत. कु. भारती पाटीलच्या या यशाबद्दल लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रा. श्रीकांतजी पाटील, कार्यवाह माननीय श्री. श्रीकृष्णाजी घड्याळपाटील संस्थेचे पदाधिकारी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुबोधकुमार सिंह, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. कु. भारती पाटील हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के.सिंह आणि इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत पुरी आदींना दिले विध्यार्थीनी चे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler