लोकमान्य महाविद्यालय वरोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन संपन्न

लोकमान्य महाविद्यालय वरोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन संपन्न

वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058


वरोरा:- लोकमान्य महाविद्यालय वरोरा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे 24 सप्टेंबर 2021 शुक्रवारी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्य आभासी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. सुबोधकुमार

सिंह उपस्थित होते. युवकांच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजना चे योगदान या विषयावर श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील इतिहास विभाग प्रमुख राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्राप्त प्रा.गुरुदास बलकी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. जयश्री शास्त्री तर परिचय आभार सह कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक लोणकर यांनी व्यक्त केले. कु.प्रीती दातारकर या स्वयंसेविकेने युवा जागर गीत सादर केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विध्यार्थी यांनी उपस्तिथी दर्शविली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler