अवैधरीत्या रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला गावर्यांनीच पकडले ट्रॅक्टर चालक रेती सोडून पळाला.
दररोज रात्री रेती तस्करीची टॅक्टरे चालतात भरवेगात
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे
चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळच असलेल्या खुटाळा येथिल गावकऱ्यांनी अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर मध्यरात्री पकडले यात ट्रक्टर चालक अरेरावी करीत होता रेती खाली करून पळण्याचा प्रयत्न करीत होता आणी तेव्हा मंडळ अधिकारी यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर ट्रक्टर चालवण्याचे प्रयत्न केला अशी माहिती खुटाळा.वाशीयांनी दिली
सविस्तर वृत्त असे की, खुटाळा, मोटेगाव, गोरवट येथुन मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी सुरू असते. रात्रभर चालणाऱ्या या रेती तस्करीच्या खेळाकडे मात्र प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे गावकऱ्यांनीच पुढाकार घेत दि. 25/09/2021 ला रात्रो नेरी येथील माया संतोष ननावरे याचा रेती भरलेला ट्रॅक्टर हा गोरवट घाटावरून खुंटाळा मार्गे तस्करी करीत असताना खुटाळा येथे गावकऱ्यांनी पडकला. सदर ट्रॅक्टर पकडल्याची माहिती प्रशासनाला दिली मात्र प्रशासनाने रात्रौ कारवाई न करता दि. 26/09/2021 ला कारवाई करण्यासाठी मंडळ अधिकारी कुमरे, तलाठी मोटेगाव व पोलीस विभागाचे कर्मचारी यांना पाठविण्यात आले. मात्र रेती तस्करीकऱ्यांच्या उन्माद इतका की त्यांनी खुद्द मंडळ अधिकारी यांचे अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न केला. नंतर मोठ्या जबरीने मंडळ अधिकारी, तलाठी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयाला जमा करण्यात आला आहे . पुढील कार्यवाही चिमूरचे उपवीभागीय अधीकारी ट्रक्टर मालकावर करतील . १ लाख १० हजार दंड बसणार आहे अशी माहीती मंडळ अधीकाऱ्याने दीली. मात्र यापुढे भरधाव वेगाने चालणारे एैवध्य रेती तस्करीची टॅक्टरे यांच्यावर वाॅच ठेवून प्रशासन कारवाई करेल काय याकडे नेरी मोठेगाव खुटाळा अन्य परीसरातील नागरीकांच लक्ष लागले आहे.