#संसदरत्न_पुस्तकाचे_प्रकाशन
दिल्लीतील तक्त राखणारा महाराष्ट्रातील नेता कैलास वासी आदरणीय राजिव भाऊ सातव यांच्या जयंतीनिमित्त संसद रत्न पुस्तकाचे प्रकाशन
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी
बाबुराव देशमुख
मो- 9325330034
आज स्व राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे त्यापैकी कळममनुरी येथे संसदरत्न पुस्तकाचे प्रकाशन मा ना प्रा.वर्षाताई गायकवाड पालकमंत्री हिंगोली तथा शालेय शिक्षण यांच्याअध्यक्षतेखाली श्री प्रकाश पोहरे संपादक दैनिक देशोन्नती यांच्या हस्ते करण्यात आले.
श्रीमती रजनीताई सातव माजी मंत्री,श्रीमती डॉ प्रज्ञाताई सातव उपाध्यक्ष ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ,श्री शिवाजीराव मोघे माजी मंत्री,श्री विश्वंबर चौधरी पर्यावरण तज्ञ,संपत कुमारजी प्रभारी मराठवाडा विभाग,श्री सत्यजित तांबे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस,आ राजेश राठोड,मा आ संतोष टारफे,,मा आ विजयराव खडसे ,सत्संग मुंढे,मा श्री संजय बोढारे जिल्हाध्यक्ष हिंगोली काँग्रेस कमिटी,यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
