विकास कामावरून सरपंच सतांपले, बिडिओ च्या दालनात ठिय्या आंदोलन

 विकास कामावरून सरपंच सतांपले, बिडिओ च्या दालनात ठिय्या आंदोलन


हिंगोली जिल्हा प्रतिनिधी

बाबुराव देशमुख

मो- 9325330034



काल झालेल्या गटविकास अधिकारी यांच्या श्री पोहरे साहेब गेले कित्येक दिवस झाले पंचायत समिती मध्ये नसल्यामुळे सरपंच यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला त्यासाठी दिवसभर त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले...*सरपंच संघटनेच्या वतीने हिंगोलीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर विविध मागण्यासाठी ठिय्या*

हिंगोली दि.२१(जि.प्र.)

       हिंगोली पंचायत समिती अंतगॕत विविध विकासात्मक कामासाठी निधी मंजुर होऊन सुध्दा पंचायत समिती कायाॕलय कडुन सरपंचाची अडवणुक होत असल्यामुळे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रतिनिधी माधवराव भवर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२१ ला गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर आक्रमक  ठिय्या आंदोलन करण्यात आले.

           आज दि.२१ ला अचानक पंचायत समिती हिंगोली गटविकास अधिकारी डाॕ.मिलिंद पोहरे यांच्या दालनासमोर गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या सरपंच संघटनेस गटविकास अधिकारी यांच्या दालनाच्या दरवाज्या कुलुप असल्यामुळे सगळेच  सरपंच आक्रमक झाले.त्यांनी घोषणा बाजी करत त्यांच ठिकाणी ठिय्या मांडला.जवळजवळ दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत घोषणा,निषेध सुरु होता. यावेळी हिंगोली पंचायत समितीचे लेखाधिकारी शाम बांगर यांनी सरपंचाशी सल्लामसलत करुन शांत करुन गटविकास अधिकारी डाॕ.मिलिंद पोहरे यांना कल्पना दिली.लगेचच ४.३० वाजता गटविकास अधिकारी पंचायत समितीच्या आपल्या दालनात येऊन सरपंचाना चचॕस बोलाविले . यावेळी सरपंच संघाचे जिल्हाध्यक्ष माधवराव भवर,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हासंघटक तथा नवलगव्हाण चे सरपंच मारोती कोरडे,तालुकाप्रमुख प्रशांत कंधारकर,उपजिल्हाप्रमुख रमेश जायभाये, सचिव नामदेवराव जाधव, सरपंच गजानन घ्यार,गजानन मुखमहाले,सरपंच भाऊराव ठाकरे, उपसरपंच शिवप्रसाद जगताप,घुगे,यांनी गटविकास अधिकारी यांच्यासोबत विविध विषयावर चचाॕ केली यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी आक्रमक होऊन बैठकीतुन बाहेर पडले.

        दरम्यान सरपंच संघाचे जिल्हाध्यक्ष प्रतिनिधी माधवराव भवर व त्यांच्या सहकारीनी सकारात्मक दृष्टिकोनातून डाॕ.पोहरे यांच्यासोबत चचाॕ केली.यावेळी विस्तार अधिकारी विष्णू भोजे,लेखाधिकारी शाम बांगर,माजी सभापती प्रतिनिधी सुमित झुळझुळे ,लोंढे यांनी सहकार्याने भुमिका घेऊन सरपंच संघटनेच्या  सदस्याना यापुढे ग्रामपंचायत च्या विकासात्मक कायाॕत सहकार्याने कामे केली जातील असे सांगून सरपंच,ग्रामसेवक,संगणक व पंचायत समिती यांच्यात ऐकवाक्यता आणली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर सरपंच संघाचे वतीने गटविकास अधिकारी डाॕ .पोहरे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी हिंगोली तालुक्यातील कांतराव घोंगडे, रमेश जायभाये,भाउराव ठाकरे ,नामदेव जाधव,बाजीराव घुगे,आनंदराव जगताप,शिवराम जगताप आदीसह अनेक सरपंच व त्यांच्या प्रतिनिधीची उपस्थिती होती .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler