जि.प.गट नेता डॉ.सातीशभाऊ वारजूकर यांनी साधला मदनापूर-मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत जनतेशी संवाद...
युवा कार्यकर्ते पक्षाची ताकद व कणा..
चिमूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी
सचिन वाघे मो.9673757006
चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांनी मदनापूर-मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत नागरिकांच्या विविध समस्या व अळचणी जाणून घेण्यासाठी संपर्क दौरा केला व संबंधित गावातील नागरिकांसी थेट संवाद साधला.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रम घेण्यात आले होते.परंतू वेळे अभावी त्यांना बऱ्याच गावांमध्ये जाता आले नाही.मात्र,लोकांबद्दलची तळमळ व कार्यकर्त्यांबद्दलची आपुलकी असल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आज चिमूर तालुक्यातील मौजा विहीरगांव,पळसगाव,पिपर्डा येथे डॉ.सतिष वारजूकर प्रत्यक्ष गेले व संबंधित तिन्ही गावातील जनतेंसी थेट चर्चा करून गावातील समस्या ऐकून घेतल्या व त्या समस्या सोडवता येतील,यासबंधाने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी मार्गदर्शनातून सांगितले.
तद्वतच सदर तिन्ही गावातील नागरिकांनी आपल्या स्तरावर त्यांचा वाढदिवस आपुलकीने साजरा केला.नागरिकांच्या संवाद प्रसंगी व वाढदिवस साजरा करणाऱ्या कार्यक्रमा प्रसंगी,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजयजी घुटके,उपाध्यक्ष राजुभाऊ चौधरी,चिमूर पंचायत समिती उपसभापती रोषणभाऊ ढोक,चिमूर विधानसभा क्षेत्र युवक कांग्रेस अध्यक्ष गौतमभाऊ पाटील,जिल्हा कांग्रेस माजी महासचिव अविनाशभाऊ अगडे,डॉ.रहेमान पठाण,ग्राम पंचायत सरपंच शीतलताई मुनढरे,ग्राम पंचायत उपसरपंच मधुकर गजभिये,ग्राम.पंचायत सदस्य विकास बारेकर,करिषमाताई पाटील,छायाताई नंन्नावरे,मीनाक्षीताई बावणे,माजी सरपंच केशवजी घरत,माजी उपसरपंच मधूकरजी दांडेकर, पोलीस पाटील कवडुजी नंनावरे,सामाजिक कार्यकर्ते महादेव मडावी,खटूजी नंनावरे,ग्राम पंचायत सरपंच बेलारा परमानंद गुरनूले,महिंद्र भिमटे,चंदूभाऊ गजभे, हिरामण मडावी,पवन बंडे,अफरोजभाई पठाण,महिला कांग्रेस सदस्य संदयाताई चन्ने,अमित नंन्नावरे,तुकडोजी नागोसे,संपूर्ण कांग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते व संबंधित तिन्ही गावातील गावकरी आपापल्या गावी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

