महिलांवरील वाढते अत्याचार व सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यासाठी प्रहार जनशक्ति पक्ष पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ पुनमताई बाळासाहेब तावरे यांनी मुक आदोंलनातुन काही मागण्या जिल्हाधिकारी यांच्या कडे केल्या

 महिलांवरील वाढते अत्याचार व सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यासाठी प्रहार जनशक्ति पक्ष पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ पुनमताई बाळासाहेब तावरे यांनी मुक आदोंलनातुन काही मागण्या जिल्हाधिकारी यांच्या कडे केल्या.

संदीप नवले जिल्हा प्रतिनिधी पुणे  87885 13797


रात्री गस्तीसाठी व महिला विषयक तक्रारी हाताळण्यासाठी दामिनी मार्शलच्या धर्तीवर पथक तयार करण्यात यावे

रेल्वेस्थानक व बसस्थानक परिसरात महिला सहाय्यक कक्ष सर्वसाधारण नागरिकांना दिसेल अशा ठिकाणी असावा

रेल्वे स्थानक व बसस्थानक परिसरांच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत

प्रीपेड रिक्षा सुरू कराव्यात  व त्याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी,

पोलिसांमार्फत रात्रीच्या वेळी रिक्षा यांची तपासणी करण्यात यावी 

बस मध्ये व रेल्वे मध्ये ज्याप्रमाणे तिकीट चेकर असतात त्याचप्रमाणे पोलिसांच्या दोन महिला कर्मचारी यांचे चालू बस मध्ये चेकिंग साठी पथक तयार करावे तर बरेचसे गुन्हे कमी होतील असे निवेदन मा. जयश्री कटारे निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले 

यावेळी प्रहार जनशक्ति पक्षांच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ पुनमताई बाळासाहेब तावरे व अध्यक्ष मा.अँड अंनतराव काळे , मा. नयन पुजारी रुग्ण सेवक महाराष्ट्र , अमोल मानकर , नौशाद शेख , शुभम शहा,  सागर ननावरे, हरिष औताडे ,सौ प्रणिता राठी उपाध्यक्षा , मा. कुंदा ढुस अध्यक्षा वडगांवशेरी , मायना जगधने , विमल शिरसाठ, वैशाली खरात , सानिका राजपुत इत्यादी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler