वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गणपत भांडेकर जेप्रा व भीमदेव नागपुरे,यांच्या परिवाराला भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची प्रत्येकी पाच-पाच हजाराची मदत,,
गडचिरोली प्रतिनिधी संदीप कांबळे9421318021
गडचिरोली जिल्यात नरभक्षक वाघाने प्रचंड धुमाकूळ माजविला आहे,गडचिरोली वनविभागा तील कार्यक्षेत्रात नरभक्षक वाघाने निष्पाप लोकांवर हल्ला करून आतापर्यंत घेतलेल्या बळीची संख्या 15 वर पोहचली असून वाघाला जेरबंद करण्यासाठी अनेक निवेदने,आंदोलने,ढोल बजाव आंदोलन सुद्धा केली आहेत,पण वाघ अजूनही जेरबंद झाला नाही,त्याचे हल्ले सुरूच आहेत,वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गणपत भांडेकर जेप्रा व भीमदेव नागपुरे देलोडा यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करीत प्रत्येकी पाच,पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देतांना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे राज्य समिती विश्वस्त शिवनाथ कुंभारे,समाजसेवक देवाजी तोफा,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन व भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे जिल्हा संपर्क प्रमुख योगेश कुडवे,प्रा.पंडीत पुडके,पंचायत समितीचे माजी सभापत्ती मनोहर पाटील झंजाळ देलोड्याचे उपसरपंच प्रमोद भोयर, गावातील प्रतीष्ठीत भास्कर समर्थ,खुशाल लाडे,जगदीश ढोलणे,जानबा नंदेश्वर,पुरुषोत्तम सहारे,लोभाजी ठाकरे,एकनाथ मशाखेञी अन्य गावकरी नागरीक उपस्थीत होेते या वेळी गावक-यानी वनविभाच्या कार्य प्रणालीवर तिव्र नाराजी व्यक्त केली. व दु:खी कुटूंबियाना वनविभागाकडून आवश्यक सगळी मद्दत मिळवून देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी सांगीतले.