गोठ्याला भीषण आग 8 जनावरे होरपळली लाखो रुपयांचे नुकसान शेतकरी हवालदिल

गोठ्याला भीषण आग 8 जनावरे होरपळली लाखो रुपयांचे नुकसान शेतकरी हवालदिल

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058

वरोरा:- वरोरा तालुक्यातील जळका येथिल शेतकरी शंकर भालचंद्र गारघाटे यांच्या घराशेजारी असलेल्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली ही आग इतकी भीषण होती की यात शेतीच्या उपकरणासह आठ जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. शंकर गारघाटे या शेतकऱ्या कडे पाच एकर शेतजमीन आहे जनावरांना व शेती साठी लागणाऱ्या साहित्यासाठी गावातच घराशेजारी गोठा बांधल्या गेला होता. या गोठ्यामध्ये गाई मशी व बैल बांधण्यात आले होते. इतर शेती साहित्य स्पीनक्रल पाईप खतांच्या तीस थैल्या विहिरींची मोटार शेती उपयोगी अवजारे या गोठ्यात ठेवण्यात आली होती. या गोठ्याला शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास आच्यांनक आग लागली. ही आग कशामुळे लागली हे अजून कळले नाही ऐन शेतीच्या हंगामात शेतीची अवजारे व जनावरे जळून खाक झाल्याने शेतकरी शंकर गारघाटे याच्यावर फरमोठे संकट  कोसळले आहे. या भीषण आगीत शेतकर्यांचे अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler