प्रहार चालक संघटनेच्या वतीने चालक दिवस हर्शोउस्ववात साजरा
उमरेड तालुका प्रतिनिधी
मनोज चाचरकर 9970643453
उमरेड, 17 सप्टेंबर 2021रोजी उमरेड येते डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवनामध्ये वाहतूक प्रहार चालक संघटनेच्या वतीने चालक दिवसानिमित्त कार्यशाळा आयोजित केली होती. त्या प्रित्यर्थ महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यातील वाहतूक शाखेतील हेड कॉन्स्टेबल विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे नियोजन करून चालकांना मार्गदर्शन करण्यात आले त्याप्रसंगी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता विलास भाऊ कांबळे तसेच उमरेड प्रहार संघटनेचे अध्यक्ष आशुभाऊ लमसोगे, पत्रकार रोशनभाऊ पाटील व पोलीस कर्मचारी मनिष कावळे , सरस्वती कुडते, स्मिता मोहोळकर, किरण वरुडकर, चालक संघटनेतील आकाश डोये, प्रमोद गुडेकर ,अंकुश मुंगले, अमोल गंधारे, निलेश डाहरे, मनोज हल्ले, विक्की पडोळे इत्यादी चालकांची उपस्थिती होती.
