पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस युवक कांग्रेसचा रोजगार दो आंदोलन साजरा.
चंद्रपूर प्रतिनिधी
प्रवीण वाघे,
चिमूर :- केंद्र सरकारचे विरोधात आक्रमक आंदोलन ना. विजयभाऊ वडेट्टीवार बहुजन कल्याण ,आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, शिवानीताई वडेट्टीवार प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप कावरे चिमूर विधानसभा यांच्या नेतृत्वामध्ये रोजगार दो आंदोलन करण्यात आले असून तहसीलदार कोवे यांना निवेदन देण्यात आले.
चिमूर येथे आज युवक काँग्रेस चे वाढत्या बेरोजगारी व वर्षाची २ कोटी रोजगार या गंभीर प्रश्नाच्या बाबतीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा मिनित्य आंदोलन करण्यात आले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून पूर्ण जिल्हा मध्ये साजरा करण्यात येत आला.सद्या या कोरोना काळातील लॉक डाऊन मुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहे .भाजप सरकार युवकांना रोजगार देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. बेरोजगरीचे संकट सद्या उभे राहिले आहे. युवकांचे भविष्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने रोजगार निर्मीती करावी व युवकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली . असंख्य कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले व बेरोजगारी विरोधात नारे देत भाजप सरकारच्या बेरोजगारी प्रश्नाबाबत तहसील कार्यालय चिमूर येथे तहसीलदार कोवे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी
युवक कांग्रेस चिमूर विधानसभा अध्यक्ष संदीप कावरे, गजानन बुटके जिल्हा परिषद सदस्य,सोनु कटारे युवक काँग्रेस नागभीड तालुका अध्यक्ष, अमित लोखंडे युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्ण जिल्हारे विधानसभा अध्यक्ष सोशल मीडिया कांग्रेस चिमूर विधानसभा , जक्कनवार
तालुका अध्यक्ष,जावाभाई शेख अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष,प्रा.राजु दांडेकर, कमलेश बांबोळे,अमेय नाईक,निखिल डोईजड , प्रशांत सोनटक्के, विकास पेंदाम, रोशन शास्त्रकार, विशाल दिवे, अश्पाक शेख, राजु मालके प्रमोद दांडेकर,संजय किरमकर,जगदिश सतिबावणे, समीर वादीकर हरीश कामडी, व ईतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

