नारी शक्ती संघटना संभाजीनगर आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी सरकारच्या विरोधात मोहटा देवी चौक बजाजनगर संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन केले
संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी अभिषेक जगताप 90756 28711
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नारी शक्ती संघटना संभाजीनगर यांचे वतीने महाराष्ट्रात महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि सरकार या कडे गांभीर्याने पाहत नाही म्हणून आज नारी शक्ती संघटना संभाजीनगर आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी सरकारच्या विरोधात मोहटा देवी चौक बजाजनगर संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन केले त्यावेळेस नारीशक्ती संघटनेच्या संयोजिका सीमाताई कुलकर्णी साधना सुरडकर ABVP च्या कु अंकीता पवार, आश्विनी वनारसे यांनी देखील आपले विचार मांडले आणि सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी अंकीता पवार यांनी सरकारने शक्ती कायदा लवकरात लवकर अमलांत आणावा अशी मागणी केली. या आंदोलनावेळी परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि विद्यार्थिनी देखील उपस्थित होत्या.