पुन्हा रेती तस्करीत माया ननावरे ची गाडी जप्त : एकाच आठवळ्यात दोनदा कारवाई

पुन्हा रेती तस्करीत माया ननावरे ची गाडी जप्त : एकाच आठवळ्यात दोनदा कारवाई


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे


चिमूर तालुक्यात मुखत्वे नेरी परिसरात रेती तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. यात लाखो रुपयांचा महसूल या रेती तस्करी मुळे बुळालेला आहे. आणि सर्रास रेतीच्या गाड्या भरदाव वेगाने पळत आहेत त्यामुळे जनतेनी महसूल विभागाला या गंभीर बाबीची जाणीव करून दिली त्यामुळे महसूल  प्रशासनातील अधिकारी यांनी कंबर कसून सापळा रचून पुन्हा एकदा रेती तस्करीत दि. 29/09/2021 ला दुपारचे सुमारास नेरी- चिमूर रोड वर ट्रॅक्टर पकडला. याअगोदर दि.25/09/2021 ला मध्यरात्री खुटाळा येथील नागरिकांनी माया ननावरे यांचाच रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला होता. मात्र या प्रकरणाला आठवळा उलटत नाही तर पुन्हा एकदा तस्करी करताना  माया ननावरे यांचाच ट्रॅक्टर  जप्त करण्यात आला. व सदर वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असुन पुढील कारवाई वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. आता पुढील कारवाई कडे नागरिकांचे लक्ष लागलेले असून कठोर कारवाईची मागणी केलेली आहे.       

या भरधाव वेगाने चारनार्या रेती तस्करीला आळा घालण्यासाठी कंबर कसलेले  कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले कुमरे मंडळ अधिकारी, ठाकरे तलाठी, निखाडे तलाठी, ठोंबरे तलाठी याचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात असून सोबतच मा. उपविभागीय अधिकारी संकपाळ व नायब तहसीलदार पवार यांचेही कौतुक केल्या जात आहे. या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler