अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आरोग्य सेवकावर गुन्हा दाखल करून कारवाही करा
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे
रुग्णसेवक जीवन तोगरे यांची पोलीस अधीक्षक यांचे कडे तक्रार
जिवती:- प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पल्लेझरी येथे आरोग्य सेवक किन्नाके यांनी यादी नुसार व्यक्तींना मच्छरदाणी वाटप न करता मच्छरदाणी वाटपात भ्रष्टाचार केला व अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार रुग्णसेवक यांनी ही मच्छरदाणी वाटपात भ्रष्टाचारा प्रकरणी वरिष्ठांना तक्रार दिल्याच्या राग मनात धरून आरोग्य सेवक किन्नाके यांनी रुग्णसेवक जीवन तोगरे यांना फोनवर खालच्या भाषेत शिवीगाळ केल्याची घटना दिनांक १९/०९/२०२१ रोजी रात्री १०:१३ वाजता घडली.
याबाबत रुग्णसेवक जीवन राजाराम तोगरे यांनी आरोग्य सेवक किन्नाके यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी तक्रार अर्जातून पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचेकडे केली आहे. व तक्रारीची प्रतिलिपी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर व मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद , चंद्रपूर यांच्या कडे केली आहे.
खालच्या दर्जाच्या भाषेत शिवीगाळ करणे हे कृत्य कर्तव्यावर असणाऱ्या आरोग्य सेवक यांना अशोभनीय आहे.नागरिकानी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथील संबंधित अधिकाऱ्यांना यासंबंधी सूचना केल्या नंतरही त्याकडे मात्र गांभीर्याने लक्ष दिल्या जात नाही. या विषयाकडे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी जातीने लक्ष घालून आरोग्य सेवक किन्नाके यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करुन कायदेशीर कार्यवाही करावी अशा आशयाची तक्रार रुग्णसेवक जीवन तोगरे यांनी केली आहे.