झाडबोरी येथील भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
नगभिड तालुका प्रतिनिधी
महेश आलबनकर मो 8788794129
भाजपाच्या चुकीच्या ध्येय धोरणांना कंटाळून,तसेच स्थानिक नेतृत्ववाबद्दल असलेली नाराजी यामुळे झाडबोरी येथील भाजपाच्या जेष्ठ व युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर,तसेच ग्रा.पं.गिरगावने राबविलेल्या विविध विकासकामांवर विश्वास ठेऊन आज दि.29/09/2021 ला मा.प्रफुलभाऊ खापर्डे सभापती,पं.स.नागभीड,मा.खोजराम मरस्कोल्हे सदस्य,जि.प.चंद्रपुर,मा.विनोदभाऊ बोरकर अध्यक्ष,सं.गां.नि.यो.नागभीड,मा.नितीन कटारे अध्यक्ष युवक कॉंग्रेस नागभीड,मा.प्रशांतजी गायकवाड सरपंच ग्रा.पं.गिरगाव,मा.शरदराव सोनवाणे उपसरपंच ग्रा.पं.गिरगाव व काँग्रेसच्या जेष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.प्रवेश घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षाचा दुपट्टा घालुन अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी जावेद शेख,शालिकराम वाघाडे,निलकंठ सोनवाणे,मोहदिन शेख,दुल्लुशफी शेख,किशोर वाघाडे,चाँद शेख,प्यारु शेख,अजीम सय्यद,प्रमोद सोनवाणे,कालु शेख,शाहरुख सय्यद,नासिक शेख,नंदु वाघाडे,कलाम तारामियाॅ शेख,गफुर शेख,मतीन शेख,शाहीर शेख,आरिफ शेख,जमाल शेख,विनोद नेवारे,महंम्मद शेख,अन्वर बाबा,विठ्ठल राऊत,मुनात शेख,राजेद्र गुरनुले,सयमत शेख,सुनिल नेवारे,मंगेश सोनवाणे,व ईतर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यामुळे आधिच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या झाडबोरी गावात काँग्रेसचे संघटन अधिक मजबुत होणार आहे.याप्रसंगी गिरगाव येथील काँग्रेसचे जेष्ठ तसेच युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.