चिमुर तालुक्यातील शंकरपुर येथील दत्त कृषी केंद्राचा परवाना रद्द करून कारवाई.

  चिमुर तालुक्यातील शंकरपुर येथील दत्त कृषी केंद्राचा परवाना रद्द करून कारवाई. 


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी:-प्रवीण वाघे, 

मो, 7038115037


बळीराजाच्या मदतीला धावलेल्या प्रहार संघटनेला &कांग्रेस पक्षाला यश


*बोगस खतांची सर्रासपणे विक्री करणे पडली महागात*


 चिमूर:- दत्त क्रुषी केद्रातुन बोगस खते सर्रासपनेन विक्री करत असल्याची  तक्रार तेथील शेतकरी कमलाकर ठाकरे यांनी जिल्हाकृषी अधिकारी चंद्रपुर यांच्याकडे केली होती मात्र याबाबत काही दखल घेतली नव्हती अनेकदा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत . असा आरोप शेतकरी कमलाकर ठाकरे यांनी  केला ह्या प्रकरणाची माहिती ठाकरे यांनी प्रहार संघटनेला श्री महेश भाऊ हजारे चंद्रपूर यांना दुरध्वनी द्वारे दिली व त्यांनी त्वरित चिमूर तालुक्यातील प्रहार सेवक यांना माहिती दीली. ताबडतोब विनोद ऊमरे हे थेट शंकरपुरला पोहचले व घडलेला प्रकार आनी शेतकर्यांच्या व्यथा जानुन घेतल्या संबंधित क्रुषी अधीकारी चंद्रपूर यांना लेखी दिली मात्र त्या लेखीचा आजपर्यंत समाधानकारक काही ऊत्तर न मिळाल्याने त्या अनुशंगाने दि, 28 आगस्ट ला शेतकऱ्यांना सोबत घेऊन उपसभापती रोशन ढोक हे थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचले व प्रहार संघटनेचे महेश हजारे यांना सोबत घेऊन चिमुर तालुक्यातील शंकरपुर येथील शेतकऱ्यांना बोगस खते विकुन फसवनुक करनारे दत्त कृषी केंद्राचे मालक राजु वैद्य  शंकरपुर  यांच्यावर कार्यवाही करुण शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवुन देण्यात यावी. व दत्त कृषी केंद्र शंकरपुर याचा परवाना रद्द करण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यलायवर सर्व शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करु आसा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष,चंद्रपुर व काँग्रेस पक्ष चिमुर च्या वतिने लेखीनिवेदनाद्वारे मा.जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आला व पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची भुमीका मांडन्यात आली.

 महेश हजारे,प्रहारसेवक चंद्रपुर , व सोबत काँग्रेस पक्ष चिमुरचे  ता.कार्याध्यक्ष विजय गावंडे, रोशन ढोक ऊपसभापती पं.समिती चिमुर, अफरोज अली,कोरपना , अशिद मेश्राम चिमुर व शेतकरी कमलाकर ठाकरे ,अशिष ठाकरे ,नकुल राऊत ,ऊद्वव खाडे, किशोर चौधरी,सुरेश भिवनकर, मारोती राजुरकर ई. ऊपस्थीत होते

प्रहार संघटनेच्या &कांग्रेस पक्षाच्या दनक्याने शासनाने सुपरफास्ट चौकशी करुन सलग निवेदनाच्या तिसऱ्या दिवशी दत्त क्रुषी केद्राचा परवाना रद्द करुन कारवाही केली. अखेर प्रहार संघटनेला & कांग्रेस पक्षाच्या व शेतकरी बांधवांच्या कार्याला यश आले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler