मेंडकी ग्रामपंचायतची ग्रामसभा गदारोळत तहकूब

मेंडकी ग्रामपंचायतची ग्रामसभा गदारोळत तहकूब

चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी          

प्रविन वाघे 7038115037




      ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी ग्रामपंचायतची चालू आर्थिक वर्षातील पहीली ग्रामसभा असल्याने दि.१५ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता सौ.मंगलाताई ईरपाते सरपंच यांचे अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू करण्यात आली. सभा सुरळीत

सुरू असताना विषय क्र.११ नुसार मेंडकि ग्रामपंचायत ला बियर शॉपी, बार अॅंड रेस्टॉरंट,व देशी दारू सुरु करण्यास नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी १४ अर्ज प्राप्त झाले आहेत तेव्हा  दारू सुरू करायची की नाही याबाबत विषय मतदानस ठेवण्यात आला तेव्हा काही निवडक लोकांनी गांवात सुरू असलेल्या २२ अवैध दारू विक्रेत्यांना हाताशी धरून गोंधळ घातला वारंवार सरपंच उपस्थित ग्रामस्थांना होय कींवा नाही या बाबत हात वर करून मतदान करा सांगित होत्या परंतु दोन्ही बाजूंनी गोंधळ घातला जात असल्याने २.४५ वाजता उर्वरित विषयावर ग्रामसभा तहकूब केल्याचे जाहीर केले. तेव्हा ५० टक्के नागरिक निघून गेले. मात्र काही लोक गोंधळ घालीत तीथेच असल्याने पोलिस कुमक मागवण्यात आली. व सरपंच, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय जावुन बसले होते.६ वाजता दरम्यान एसडीपीओ मिलिंद शिंदे आले आणि मतदान घेण्याचा सरपंचा वर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.परंतु सरपंचा मंगला इरपाते न घाबरता ग्रामसभेत गोंधळ झाला असल्यामुळे नियमाप्रमाणे सभा तहकूब केली आहे ती नियमाप्रमाणे पुढे घेण्यात येईल असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler