गळफास घेऊन तरुनाने केली आत्महत्या
प्रतिनिधी महेश आलबनकर
मो 8788794129
नागभीड : तालुक्यातील मौजा मिंथुर येथील एका ३० वर्षीय विनोद दादाजी नन्नावरे या तरुनाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक दिनांक ११/९/२०२१ रोजी रात्री ९.३० वाजता खर्रा खायच्या निमित्याने घराच्या बाहेर गेला त्यानंतर तो घरी परतला नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी शोध घेतला असता मींथुर येथील स्मशानभूमी कडे जाणाऱ्या कच्चा रोडलागत एका निंबाच्या झाडावर विनोद दोराने लटकून फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत ची माहिती पोलिस स्टेशन नागभीड येथे सकाळी ८ वाजता देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी पोहचून प्राथमिक माहिती घेतली त्यानंतर मृतका चे शव ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे शव विच्छेदनसाठी नेण्यात आले. मृतक विनोद नन्नावरे याचे पचात कुटुंबात वडील, आई, भाऊ असा आप्त परिवार आहे. आत्महत्या मागील नेमके कारण अजून कळले नाही. मात्र पुढील तपास ठाणेदार प्रमोद मदामे यांचे मार्गदर्शनात पो. ह. वा. येरमे करीत आहेत.