नेरी आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी नियुक्त करा
दहा दिवसाच्या आत MBBS डाॅक्टर ची नियुक्ती न केल्यास खुर्ची जप्त आंदोलन करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी यांना प्रहार जनशक्ती पक्षाने दिले निवेदन
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे
नेरी प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वात मोठे आरोग्य केंद्रअसून या केंद्रा अंतर्गत सहा उपकेंद्र असून अनेक खेडे या प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात परंतु या केंद्रामध्ये एकही एमबीबीएस डाॅक्टर नसून बीएएमएस डॉक्टर आहे त्यामुळे उपचार करण्यासाठी रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयात किंवा बाहेर ठिकाणी उपचारासाठी न्यावे लागते त्यामुळे नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने उपविभागीय अधिकारी यांना 3 सप्टेंबर ला निवेदन सादर केले आणि मागणी पूर्ण नाही झाल्यास खुर्ची जप्त आंदोलनाचा इशारा दिला आहेतालुक्यात नेरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे मोठे केंद्र असून या केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाही त्यामुळे परिसरातील रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात किंवा बाहेर गावी जावे लागते सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात बीएएमएच डकटर उपलब्ध असल्यामुळे रुग्णाची तपासणी योग्य रित्या होत नाही तसेच आकस्मिक व गंभीर स्वरूपाचे रुग्ण आल्यास त्यांना इतरत्र हलवावे लागते रात्री तर डाॅक्टर राहतच नाहीत कदाचित रुग्णाचा जीव सुद्धा गमावण्याची पाळी सुद्धा येऊ शकते त्यामुळे गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे येत्या दहा दिवसात आरोग्य विभागाने एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी ची नियुक्ती केली नाही तर खुर्ची जप्त आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आला,
सदर बाबीची प्रतिलिपी राज्य मंत्री बच्चूभाऊ कडू आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब व मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले,
उपस्थित प्रहार सेवक शेरखान पठाण, अशद मेश्राम, अक्षय कामडी, साजीत शेख, आवेज शेख, आशीष कामडी, प्रवीण बोरसरे, उपस्थित होते,
