संत सेना महाराज यांना अभिवादन व वंदन,,
संदीप कांबळे
गडचिरोली शहर प्रतिनिधी
9421318021
श्री गुरूदेव योग शिक्षण व सेवा समिति गडचिरोली व नगाजी महाराज देवस्थान कमेटी यांच्या वतीने आज दि,4 सप्टेंबर ला संतश्रेष्ठ सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य सामुदायिक प्रार्थना व गोपाळ काल्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्व प्रथम सेना महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.याप्रसंगी खुशरंग शेंडे, अध्यक्ष नगाजी महाराज देवस्थान कमेटी, मधुकर सूर्यवंशी, मनोहर कूदरपवार, रामजी कूदरपवार, नामदेव शेंडे, अमित तीवाडे, अनंता पांदिलवार, मीनानाथ पगडे, दूधराम महाजनकर, बाबा नक्षिने, संदेश नक्षिने, प्रणय मेडपललिवर, प्रभाकर लांडगे, रमेश नक्षिने, विध्या नक्षिने, अर्चना नक्षिने, रेखा सुर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण मुक्तवरम ज़िल्हा प्रचारक गडचिरोली व आभार प्रदर्शन नामदेवराव ईजनकर यांनी केले.गोपाळ काला वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, याप्रसंगी खूप मोठ्या प्रमाणात गुरुदेव भक्त उपस्थित होते,,
