पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्रम्हपुरी तालुक्यातील विद्यमान सरपंच, ग्रा.पं.सदस्य यांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

 पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्रम्हपुरी तालुक्यातील विद्यमान सरपंच, ग्रा.पं.सदस्य यांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश


  ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि

   मनोज अगळे         9765874115



           वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे केंद्रशासनाच्या विरोधात जनमानसात तीव्र संताप आहे. 

त्यामुळे आता नागरिकांचा कल काँग्रेस पक्षाकडे वाढलेला दिसून येत आहे.

             राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, बहुजण कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जि.प.सदस्या सौ. स्मिताताई पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी तालुक्यातील बोरगाव येथील सरपंचा सौ. मेघा पिंपळकर, पारडगाव येथील सरपंच पिंटु पिल्लेवान, चिंचोली ग्रा.पं. सदस्य हरीदास शिंगाडे, बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कवडु पिंकळकर यांसह विविध पक्षातील अन्य कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

        यावेळी पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांना पक्षाचे दुपट्टे घालून त्यांचे स्वागत केले.

         यावेळी सदर पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमेटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, पं.स. माजी सभापती नेताजी मेश्राम, मालडोंगरीचे माजी सरपंच राजेश पारधी, नगरसेवक डॉ. नितीन उराडे, उदापुर येथील उपसरपंच योगेश तुपट, वामन मिसार, मुन्ना रामटेके, पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार यांसह अन्य कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler