वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा मृत्यू ,भीमदेव नागापुरे रा,देलोळा खुर्द इसम ठार.
नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात झाले 15 बळी.
गडचिरोली शहर प्रतिनिधी
संदीप कांबळे 9421318021
गडचिरोली पासून 12 किलोमीटर अंतर असलेल्या नवरगाव लगत असलेल्या जंगल परिसरात काल सायंकाळी 4 वाजता च्या सुमारास भीमदेव नागापुरे रा,देलोळा खुर्द आपल्या कामासाठी शेतीवर गेले असता जंगलात दबा धरुण बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले,पण त्याचा मृतदेह आज सकाळी आढळून आला,
श्री , किशोर मानकर साहेब मुख्य वनसंरक्षक यांनी वाघाच्या बंदोबस्त करण्यासाठी लिखित आश्वासन सुद्धा दिले होते,नागझिरा मधील शूटर सुद्धा मागील दहा ते बारा दिवसापासून वाघाच्या शोधात आहे, 15 इसमाचा वाघाकडून हल्ला होऊन जीव जाणे म्हणजेच गडचिरोली करांना पडलेला खूप मोठा प्रश्न आहे, अजून किती बळी हा नरभक्षक वाघ घेणार असा गंभीर प्रश्न गडचिरोली तील व परिसरातील जनतेला पडलेला प्रश्न आहे,
बातमी लिहेपर्यंत वनविभागाची टीम घटना स्थळावर आली व पंचनामा सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे,
वाघाच्या बंदोबस्तासाठी आणखी किती उपोषण,आंदोलन,व धरणे करायचे की असेच एकामागून एक जीवांचा बळी देत राहायचा असा सवाल सुद्धा जाणते कडून संबंधित खात्याला विचारला जात आहे.

