ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे रुग्णांना करावी लागते औषधीसाठी प्रतीक्षा
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
सतीश नेवारे 8459432185
गोंडपिपरी :- अत्यंत मागास व नक्षलग्रस्त असलेल्या तालुक्यातील नागरिकांना सामान्य आजारावरील उपचारासाठी गोंडपिप्री येते यावे लागते. मागील दोन वर्षापासून रुग्णालय, डॉक्टर तसेच रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता लोकांची सेवा केलेली आहे. परंतु आता गोंडपिप्री येथील ग्रामीण रुग्णालयात एक वेगळेच दृश्य पाहायला मिळत आहे.
गोडपिंपरी शहरातील ग्रामीण रुग्णालयात बाहेरून येणाऱ्या रुग्णांना तपासण्यासाठी बाह्यरुग्ण वेळ ही सकाळी 9:00 ते दुपारचे 1:00 वाजेपर्यंत ची असते . बाहेरून येणाऱ्या रुग्णांना तपासण्यासाठी येथील डॉक्टर वेळेवर म्हणजेच 9:00 वाजता हजर असतात. परंतु कमालीची बाब म्हणजे रुग्णांना तपासून डॉक्टर जेव्हा त्यांना गोळ्या औषधी लिहून देतात, तेव्हा रुग्णालयातील औषधालय सांभाळणारे कर्मचारी मात्र 9:22 वाजून गेले तरी हजर नसल्याने औषधांसाठी रुग्णांची चांगली कोंडी होताना दिसत असल्याचे दृश्य पाहायला मिळते.जर एखाद्या वेळेस रुग्णाला तात्काळ औषधी मिळत नसेल आणि त्यामुळे त्या रुग्णाचे काही बरे-वाईट झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांकडून केल्या जात आहे. रुग्णालयातील औषधालय कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार चालवून ठेवला आहे. वेळेवर हजर न राहणे हे एखाद्या आपत्कालीन रुग्णाच्या जीवावर बेते पर्यंत त्या कर्मचाऱ्यांना जाग येईल की नाही अशी चर्चा रूग्णालयातील परिसरात होताना दिसते, ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथील औषद्यालयाला सकाळी 9:22 वाजता सुद्धा कुलूप लागलेलेच ही बाब येथील संबंधित लक्षात आणून दिल्यावर सुद्धा यावर उत्तर म्हणून कुठलीच कारवाई होताना दिसत नसल्याने बाह्यरुग्ण विभागात जाणाऱ्या रुग्णांचा संताप वाढत चाललेला आहे. असे सूत्रांकडून कळते
या समस्येवर रुग्णालयात प्रशासन काय तोडगा काढणार आता याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे,

