नदीवरील पुराच्या पाण्यात बोलेरो जीप गेली वाहुन

 नदीवरील पुराच्या पाण्यात बोलेरो जीप गेली वाहुन


(गाडीत सापडलेल्या वस्तुच्या अंदाजावरुन सदरील गाडी चोरट्यांची असण्याची शक्यता)


समाधान बंगाळे।

 तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा

 

 तालुक्यातील राहेरी- शेवली राज्य महामार्ग क्रमांक २२२ वरील वर्दडी बुद्रुक येथिल नदीला दुथडी पुर असल्याने दि २२ सप्टेंबर रोजी मध्य रात्री बोलेरो जीप क्रमांक. MH18.W4482 वाहुन गेल्याची घटना घडली आहे.

२० सप्टेंबर पासुन चालू असलेल्या विजेच्या कडकडासह मुसळधार पावसामुळे नदीला पुर सतत तीन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात चालू आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी

डोकेदुखी वाढली आहे व नदीकाठच्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे‌.  मध्यरात्री वाहुन गेलेल्या जीपमुळे अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे.

वाहुन गेलेल्या जीपमध्ये एकही प्रवाशी दिसत नाही, जीपवर असलेल्या क्रमांकांवर पोलिस व स्थानिक नागरिकांनी संपर्क केला असता मुळ मालक धुळे जिल्ह्यातील असुन  गाडी मालकाचे नाव सुधीर व्यंकटराव गावीत असल्याचे ते सांगतात माझी गाडी परवा २१ सप्टेंबर रोजी चोरीला गेली असुन मी तालुका पोलीस ठाणे नंदुरबार येथे गाडी चोरीला गेल्या बाबत आज्ञाता विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.या माहिती नुसार किनगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक  युवराज रबडे यांनी स्थानिकांच्या मदतीने त्या जीपची झडती घेतली असता सदर जीपमध्ये लोखंडी पहार, कटर, घन (हातोडा), मातुॆल, राॅड  अशा विविध लोखंडी वस्तू आढळुन आल्या आहेत. मग गाडीतील प्रवाशी वाहुन गेले की काय ? गाडीतील प्रवाशी दरोडेखोर असुन गाडी ढकलुन पसार झाले असतील का? असे तर्कवितर्क लढवले जात आहे यावेळी पोलिस हेड कॉन्स्टेबल रमेश गोरे, श्रावण डोंगरे, व सलीम परसुवाले यांच्या सह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler