लोहारा बोथली येथील आपादग्रस्ताना आ बंटीभाऊ भांगडीया कडून आर्थिक मदत,

लोहारा बोथली येथील आपादग्रस्ताना आ बंटीभाऊ भांगडीया कडून आर्थिक मदत, 


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे


नेरी। येथून जवळ असलेल्या लोहारा आणि बोथली येथील आपदग्रस्त ना आ बंटी भांगडीया कडून आर्थिक मदत देऊन त्यांच्या कुटूंबाला मदतीचा हात दिला

         लोहारा येथील सरस्वती जांभुळे शांता माहुरे पुरुषोत्तम रामटेके आंनदराव उरकुडे हे मागील अनेक दिवसांपासून आजारी होते त्यांचा उपचार सुरू होता परंतु पुढील उपचार करण्यासाठी त्यांच्या कडे आर्थिक कुमुक नसल्यामुळे त्यांच्या उपचारात बाधा निर्माण झाली होती ही बाब स्थानिक कार्यकर्त्यांना माहिती झाली तेव्हा त्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली तसेच बोथली येथील गोरेश्वर चौधरी यांचे बैल तात्काळ मरण पावले अचानक आलेल्या संकटाने शेतकरी हतबल झाला त्यामुळे ह्या बाबी  तात्काळ  स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपा तालुका अध्यक्ष राजू पा झाडे व रमेश कंचरलावार याना सांगितली तेव्हा त्यांनी तात्काळ या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया  याना कळविले तेव्हा क्षणाचाही विलंब न करता समाजकार्यात पुढे असलेले दिंनदलितांचे व सवरसमान्यांचे अश्रु पुसण्याचे कार्य हाती घेतलेले समाज सेवक लोकप्रिय आमदार यांनी तात्काळ मदत जाहीर करून कार्यकर्त्यांच्या हस्ते मदत पाठवीत आपदग्रस्त ना वितरित केली 

        यावेळी मदत देताना डा शामजी हटवादे प्रदेश सदस्य भाजपा संदिप पिसे जी प प्रमुख  विलास कोराम प स प्रमुख पिंटू खाटीक ग्रा प सदस्य महादेव कोकोडे माजी सरपंच शैलेंद्र पाटील डाँ लांजेवार दिवाकर जांभूळे उत्तम रामटेके प्रशांत सहारे आणि सर्व भाजपा कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler