नेरी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार

नेरी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार

चिमूर तालूका ग्रामीण प्रतिनिधी

सचिन वाघे मो. 9673757006



नेरी येथील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे .

येथील महावितरणचे मुख्य इंजिनियर हे नेहमीच उशीरा येतात नेरी जवळील खेडयावरील नागरीक महावितरण कंपनीत जाऊन इंजिनियर नसल्याने त्यांची कामे होऊ शकत नाही नागरिकांच्या म्हणण्या नुसार इंजिनियर हे नेहमी दोन च्या नंतर येतात आम्हाला जास्तीचे विजेचे बिल कमी करायचे असेल किंवा नविन मिटर जोडनी करायची असेल तर ते इंजिनियर च्या परवांगी शिवाय होत नाही.

एखादया वेळेला विज बिल भरले नसेल तर महावितरण कंपनी चे कर्मचारी पुर्व सुचना न देता घरची विज कापुन टाकतात विज कापतांना त्या घरी कोणी हजर नसेल तरीसुद्धा ते विज कापुन टाकतात व हे कर्मचारी इथेच थांबत नाहीत ज्या व्यक्तीची विज कापली तो व्यक्ती बिल भरण्यासाठी गेला असता त्याला विज जोडनी रुपये २४० असे भरावयास सांगतात तरच विज जोडून मिळेल असे बोलतात गावात एखादा बिघाड झाल्यास त्याची तक्रार करण्यात आल्यावर ते दुरस्ती साठी तिन ते चार दिवस लावतात   असा मनमानी कारभार नेरी महावितरण कंपणीच्या कर्मचाऱ्यांचा सुरू आहे . अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागनी नेरी जवळील खेडयातील व नेरीतील नागरीकांनी केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler