चिमूर येथे महाविकास आघाडी तर्फे चक्का जाम आंदोलन, पंतप्रधान व गृहमंत्राना दिले निवेदन,

चिमूर येथे महाविकास आघाडी तर्फे चक्का जाम आंदोलन, पंतप्रधान व गृहमंत्राना दिले निवेदन,


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे




       उत्तर प्रदेशातील लखिमपुर खीरी येथील घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी चिमूरच्या वतीने चक्का जाम आंदोलन करुण उपविभागीय अधिकारी याना निवेदन देण्यात आले,

      उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून चिरडुन टाकल्याच्या घटनेचा सम्पूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे, देशातील शेतकर्यावर भाजपाच्या केंद्र सरकार कडून साततत्याने अन्याय अत्याचार होत आहे, भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनीला ही लजवेल असे असून लखीमपुर खीरी येथील शेतकऱ्यांना सामूहिक रित्या ठार मारल्याची घटना जनरल डायर ने केलेल्या हत्याकंडाची आठवण करुण देणारी आहे,  या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी चिमूर तालुका महाविकास आघाडी सरकारच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांचे नेतृत्वात चिमूर शहरात व्यापारी मंडळीना दुकाने बंद करून आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले,  शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, कांग्रेस तालुका अध्यक्ष संजय घुटके, राष्ट्रवादी कांग्रेस तालुका अध्यक्ष राजू मुरकुटे यांचे नेतृत्वात सोमवार 11 ऑक्टोम्बर रोजी चिमूर चक्का आंदोलन करुण उपविभागीय अधिकारी यांचे मार्फ़त पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा याना निवेदन देण्यात आले,

            यावेळी शिवसेना उपजिलाप्रमुख प्रमुख अमृत नखाते, विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे, जेस्ट कांग्रेस कार्यकर्ते धनराज मुंगले, कांग्रेस तालुका सचिव वीजय डाबरे, शहर अध्यक्ष अविनाश अगड़े, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अनिल रामटेक, बाळकृष्ण बोभाटे, राजू दांडेकर, धनराज मालके, राजेश चौधरी, पप्पू शेख, गौतम पाटिल, सुधाकर निबटे, अनिल डगवार, देवीदास गिरडे, रोशन जुमड़े, अन्ना गिरी, उमेश हिंगे, आशीष बगुलकर, राकेश साठोने सुरेश गजभे, गौतम पाटिल हरिदास सोरदे, प्रशांत डवले, संदीप कावरे, निखिल डोंइज्ड , प्रणय शिंदे,कमलाकर बोरकर,मनीष वझरे, रामदास चौधरी,  नाजेमा पठान, शहनाज अंसारी, माधुरी केमये,व सर्व महाविकास आघाडी पदाधिकारी उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler