कोरोना लसीकरण गडचिरोली शहरात जवळजवळ 80%पूर्ण,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे 9421318021
कोरोना या महाभयंकर रोगाने जगात थैमान घातल्यानंतर आज परिस्थिती थोडी थोडी सुधारत आहे,व येणारी पुढची परिस्थिती बिगडू नये यासाठी
गडचिरोली शहरात आजपर्यंत जवळजवळ 80% लसीकरण पूर्ण झाल्याचे चित्र आहे
महिला रुग्णालय गडचिरोली येथे खूप कमी अश्या रांगा आता दिसत आहे,
टोचाल तर वाचाल असे म्हणत गडचिरोली शहरातील प्रत्येक नागरिक लसीकरण करून या महाभयंकर आजारांपासून मुक्तता मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे एकच चित्र महिला रुग्णालय गडचिरोली येथे पहावयास मिळत आहे,
तोंडावर नेहमी मास्क वापरायचा,सॅनिटायझर ने नेहमी हात स्वच्छ करत राहायचे ,व दोन फूट अंतरावरून संपर्क ठेवायचा या बाबी आता नित्याचाच झाल्या आहेत,काही दिवसात गडचिरोली शहरात 100% जनता कोरोना लसीकरण करणार हे निश्चित आहे,