केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारचा महाविकास आघाडी सरकारतर्फे जाहीर निषेध नागभीड मध्ये कडकडीत बंद
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे
नागभीड आज दि.११/१०/२०२१ ला नागभीड तालुका महाविकास आघाडीच्या वतीने उत्तरप्रदेश मध्ये लखीनपुर खिरी येथील न्याय मागणारे शेतकरी बांधव यांना तेथील भाजप नेते व गृहराज्य मंत्री यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी चालवुन चिरडुन टाकले.या अशा हिटलर सारखे कृती करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहीजे. त्यासाठी आज नागभीड येथे व्यापारी संघटनेनी दुकाने बंद ठेवुन सहकार्य केले यावेळी महाविकास आघाडी नागभीड तर्फे बाईक रॅली काढून केंद्र सरकारचा व उत्तरप्रदेश सरकारचा निषेध करण्यात आले.तसेच महाविकास आघाडी तर्फै तहसिलदार साहेबाला निवेदन देण्यात आले. यावेळी चंद्रपुर जि.प.गटनेते डाँ.सतिशभाऊ वारजुकर, तालुका काँग्रेस कमिटी नागभीडचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस कमीटी ता.अध्यक्ष विनोदभाऊ नवघडे, शिवसेना ता.अध्यक्ष भोजराजभाऊ ज्ञानबोनवार, काँग्रेस कार्याध्यक्ष गणेशभाऊ गड्डमवार,काँग्रेस कोषाध्यक्ष रामकृष्णजी देशमुख,काँग्रेस सचिव दिलीपभाऊ मानापुरे,राष्ट्रवादीचे मंगेशभाऊ सोनकुसरे, प्रशांतभाऊ घुमे, काँग्रेसचे उपाध्यक्ष बंडुभाऊ खोब्रागडे, रमेशभाऊ ठाकरे,किशोरभाऊ समर्थ,महिला काँग्रेस ता.अध्यक्षा ज्योत्सनाताई वारजुकर ,राष्ट्रवादी महिला अध्यक्षा निर्मलाताई रेवतकर,दिवाकरभाऊ निकुरे, नगर परिषद गटनेते संजयभाऊ अमृतकर, नागभीड शहर अध्यक्ष डॉ.रवींद्र कावळे,युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पारसभाऊ नागरे, युवानेते अमोल वानखेडे, पंकज काळबांधे,संदिप डांगे, प्रहारचे ता.अध्यक्ष वृषभ खापर्डे, मनोहरजी मेश्राम सर, अमृतजी शेंडे,अरूणजी गायकवाड, हेमंतभाऊ लांजेवार युवक ता.काँग्रेस कार्याध्यक्ष सौरभ मुळे, एनएसयुआय अध्यक्ष सुरज चौधरी, मोहनीश देशमुख,पं.स.सद्स्या प्रणयाताई गड्डमवार, नगरसेवक प्रतीक भसिन,नगरसेविका आशाताई गायकवाड, सुनंदाताई माटे, सारिकाताई धारणे, काँग्रेस युवा शहर अध्यक्ष अमित संदोकर,पिंटु बुरबांधे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शाहरुख शेख, वनिताताई सोनकुसरे, हरीषभाऊ मुळे, प्रमोदभाऊ गायकवाड,नाशीर शेख, सागर खोब्रागडे श्री.मुर्लीधरजी मोरांडे,सुधाकरजी पेंदाम,सेलोकर ताई महेश कुर्झेकार,बबन धारणे, गोपालभाऊ मस्के, तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.