चिमूर नगर परिषद मध्ये आकृतीबंधानुसार कर्मचारी नाही विविध पदे रिक्त.कायमस्वरूपी मुख्याधिकारी व राज्यसंवर्ग कर्मचारी देण्याची मागणी..

चिमूर नगर परिषद मध्ये आकृतीबंधानुसार कर्मचारी नाही विविध पदे रिक्त.कायमस्वरूपी मुख्याधिकारी व राज्यसंवर्ग कर्मचारी  देण्याची मागणी..

सामाजिक कार्यकर्ते पप्पु भाई शेख 


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे



 चिमूर नगर परिषद चा पहिला पंचवार्षिक कार्यकाळ संपला पासून प्रशासकाच्या हातात नप चा कारभार असल्याने मनमानी कारभार सुरू आहे.  विविध पदे रिक्त असल्याने जनतेची कामे होत नाही.जनता त्रस्त झालेली आहे. नगर परिषद मधील विविध रिक्त पदे भरून कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते  पप्पूभाई शेख यांनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मा.ना. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मा. एकनाथ शिंदे,व चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.विजयभाऊ वडेट्टीवार, व चंद्रपुर जिल्ह्याचे  जिल्हाधिकारी साहेब यांना  दिलेल्या निवेदनातून केली आहे.चीमूर नगर परिषद मध्ये प्रभारी मुख्याधिकारी च्या भरोश्यावर सुरू असल्याने विविध विकास कामे व आजारावरील प्रतिबंधित कार्यवाही करण्यासाठी अकार्यक्षम ठरत आहे.विविध पदे रिक्त आहे. त्यात स्थापत्य अभियंता श्रेणी ब १ पद, कर निधारण प्रशासकिय सेवा श्रेणी ब चे २ पदे, जलदाय मलनिस्सारण स्वच्छता अभियांत्रिकी श्रेणी क चे १ पद, असे एकूण ५ पदे रिक्त आहे. 

नप ला कायम स्वरूपी मुख्यधिक्कारी सहित रिक्त पदे भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पप्पुभाई शेख यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली असून निवेदन देत असताना गौतम पाटील ,प्रदीपजी तळवेकर उपस्थित होते.

प्रतिलिपी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालकमंत्री विजय वड्डेटीवार,नगर विकास मंत्री एकनाथ थुटे तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler