काजळसर येथे वन्यजीव सप्ताह साजरा

काजळसर येथे वन्यजीव सप्ताह साजरा


चिमूर तालुका ग्रामिन प्रतिनिधी

सचिन वाघे नेरी.9673757006



तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालया तळोधी  बा.अंतर्गत  नेरी उपक्षेत्रातील  काजळसर येथे  वन्यजिव सप्ताह दि. 06/10/2021 ला साजरा करण्यात आला.        

                या शिबिरात काजळसर येथील आदर्श विद्यालय  च्या 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला  एक दिवसीय  शिबिरात वनसंदर्भात विविध  विषय हाताळन्यात आले वनपरिक्षेत्र अधिकारी धोंडणे  यांनी वन्यजिव सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  तरुण पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य अमोद गौरकार यांनी साप , व वन्यजिव  संवर्धनावर मार्गदर्शन केले.वन्यजिव प्रेमी कवडु लोहकरे यांनी  वाघ व वन्यजिव संवर्धनावर मोलाचे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना जंगलात निसर्ग भ्रमण करुण जंगल नाल्यावर  पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमे अंतर्गत सिमेंट बॅग चा बंधारा बांधण्यात आला .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, क्षेत्र सहाय्यक   रासेकर , काजळसरचे सरपंच नन्नावरे , उपसरपंच, गावचे पोलीस पाटील , वनरक्षक नागरे, वनरक्षक प्रधान  व वनव्यवस्थापन समिती चे अध्यक्ष प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक नागरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler