बोथली विधी सेवा समिती अंतर्गत कायदेविषयक कार्यक्रम संपन्न

बोथली विधी सेवा समिती अंतर्गत कायदेविषयक कार्यक्रम संपन्न

चिमुर तालुका ग्रामिन प्रतिनिधी

सचिन वाघे नेरी मो.9673757006


राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाअन्वये आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाअन्वये तालुका विधी सेवा समिती चिमूर अंतर्गत मा.अड भेंडे साहेब  यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन मौजा बोथली येथे  हनुमान मंदिर च्या  आवारात दि 6 ऑक्टोबर ला करण्यात आले होते. त्यानिमित्ताने ऑनलाइन पध्दतीने प्रोजेक्टरवर माहितीपट दाखवण्यात आले तसेच कायद्याच्या विषयाच्या अनुषंगाने संबंधित माहिती पत्रके वाटून त्यावर जनजागृती करण्यात आली.याप्रसंगी न्यायाधीश अड भेंडे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी  गुंतीवार यांनी केले.या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून वनविभागाचे क्षेत्रसाह्ययक  रासेकर तलाठी निखाडे , कामडे, आरोग्य सेवक निखाडे   आरोग्यसेवक रोठोडं चौखे घोटेकर आणि ग्रामसेवक गाहणे प्रमुख म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी कायदेविषयक माहिती नागरिकांना दिली तसेच नागरिकांना कायदा काय असतो हे समजावून सांगितले आणि त्याचा वापर कशा करायचा व कायद्याच्या बंधनात राहून कसे जगायचे हे समजावून सांगितले या कार्यक्रमाला मनोहर चौधरी सरपंच रामू झोडे उपसरपंच  ग्रा प सदस्य महादेव शेरकुरे सदाशिव मगरे रामकला श्रीरामे  पोलीस बागडे ताडले बलराम नागपुरे आशाताई निकिता सहारे सौ झोडे रोजगार सेवक प्रताप नागपुरे हकीम नागपुरे  आदींनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला गावातील सर्व महिला पुरुष उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler