प्रहार सेवकांनी जाणून घेतल्या शिवाजीनगर वासियांच्या समस्या वेकोलीच्या जीवघेण्या प्रदूषणामुळे नागरीक हैराण
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
माजरी :- प्रहार जनशक्ति पक्षाचे चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या सुचनेनुसार ६ ऑक्टोंबर रोज बुधवारला प्रहार जनशक्ति पक्षाचे प्रहार सेवक यांच्या नेतृत्त्वात शिष्ट मंडळाने भद्रावती तालुक्यातील माजरी येथिल शिवाजी नगर भागाची पाहणी करीत तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या .
माजरी - वेकोली नागलोन टू ओसी खुल्या कोळसा खाणीतील प्रदूषणामुळे शिवाजी नगर मधील रहिवासी हैराण झाले आहेत . खाणीत होणाऱ्या ब्लॉस्टिंगमुळे येथिल नागरिकांच्या घरांना भेगा पडतात . कोळसा उत्पादनानंतर मातीचे ढिगारे उभे झाल्याने वेकोलीचे रसायनयुक्त पाणी वस्तीत शिरते . त्यामूळे येथिल नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .२०१४ पासून सुरू झालेल्या या कंपनी विरोधात आपल्या न्याय्य मागण्यांना घेवुन येथिल रहिवाशी प्रशासना सोबत पत्रव्यवहार , निवेदने देवूनही कुठलीच दखल प्रशासनाने न घेतल्याने . येथिल रहिवाशी महिलांचे शिष्ट मंडळ प्रहार जनशक्ति पक्षाचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख गजु कुबडे यांच्या कडे आपली व्यथा मांडली . त्यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रहार सेवक यांच्या नेतृत्त्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने येथिल नागरिकांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या यावेळी प्रहार सेवक जगदीश लांडगे , अतुल निब्रड, सूरज घुमे, ओंकार कांबळे , प्रमोद देठे, मेघराज भोयर तथा इतर प्रहार सेवक उपस्थित होते.कोळसा खाण लगत असलेल्या कुटुंबांना जो पर्यन्त योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणारं नाही तो पर्यंत प्रहारच्या माध्यमातुन हा लढा सुरू ठेवू असे आश्वासन यावेळी प्रहार सेवकांनी येथिल नागरिकांना दिले .