१ नोव्हेंबर २०२१ पासुन गाड्यांच्या (किराया) दरामध्ये होणार बदल

१ नोव्हेंबर २०२१ पासुन गाड्यांच्या (किराया) दरामध्ये होणार बदल

भद्रावती ग्रामीण प्रतिनिधी 

मंगेश भोयर 7387980876


भद्रावती ट्रॅव्हलर मालक असोसिएशन, भद्रावती यांचा एकमताने निर्णय

भद्रावती : शहरातील सर्व मिनी बस म्हणजेचं ट्रॅव्हलर मालकांची दिनांक १३ ऑक्टोबरला सभा घेण्यात आली.डिझेल शंभरी पार झाल्यामुळे तसेच डिझेलचा रोजचा वाढता दर पहाता ट्रॅव्हलर गाड्यांच्या (किराया) दरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे भद्रावती शहरातील सर्व ट्रॅव्हलर मालकांनी एकमताने १ नोव्हेंबर २०२१ पासुन दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

गाड्या सिटनुसार आणि नविन दर (Rate) :

१७, २० सिटर ट्रॅव्हलर - प्रती दिवस - ३,०००/-

१७, २० सिटर ट्रॅव्हलर - दिवस - रात्र - ४,५००/-

२६ सिटर ट्रॅव्हलर - दिवस - ४,५००/-

२६ सिटर ट्रॅव्हलर - दिवस - रात्र - ६,०००/-

१७ सिटर प्रती कि.मी. दर - २४/- किमी

२० सिटर प्रती कि.मी. दर - २६/- किमी

२६ सिटर प्रती कि.मी. दर - ३५/- (Non AC)

२६ सिटर प्रती कि.मी. दर - ३८/- (AC)

नविन नियमावली जाहीर :

वरिल सर्व दरांचे फलक ट्रॅव्हलर मालकांनी गाडीमध्ये लावावे.

टोल टैक्स, पार्किंग, आर. टि. ओ. परमिट आणि महाराष्ट्र बाहेरील राज्य कर (Border Tax) हे किरायामध्ये समाविष्ट नसेल. वरिल सर्व कर हे ग्राहकांना भरावा लागेल.

कोणत्याही गाड़ी मालकाने असोसिएशनने ठरविल्या पेक्षा कमी दरात गाड़ी किरायाने देऊ नये. तसेचं नियम भंग करू नये.

असे आढळल्यास गाड़ी मालकावर* असोसिएशन कडुन कार्यवाही करण्यात येईल. तसेचं घेतलेली ट्रीप कँसल करण्यात येईल. याची सर्व जबाबदारी ही गाड़ी* मालकाची आणि ग्राहकांची असेल.

नविन दर (Rate) हे १ नोव्हेंबर २०२१ पासुन लागु होईल

असे आवाहन भद्रावती ट्रॅव्हलर मालक असोसिएशन, भद्रावती यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler