दुसरबिड येथे स्व.महर्षी भास्कररावजी शिंगणे साहेब यांच्या स्मृतींना वाहीली आदराजंली.

 दुसरबिड येथे स्व.महर्षी भास्कररावजी शिंगणे साहेब यांच्या स्मृतींना वाहीली आदराजंली.

समाधान बंगाळे।तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा

जिल्ह्याचे नेते तथा सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त सिंदखेडराजा येथुन निघालेल्या स्मृतीज्योतचे स्वागत करत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदरांजली अर्पण केली.

आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले जिल्ह्याचे सहकार नेते स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सिंदखेडराजा ते बुलढाणा स्मृती ज्योतीचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते. स्मृति ज्योत मार्गस्थ असताना ठीक ठिकाणी साहेब प्रेमी दर्शन घेऊन आदरांजली अर्पण करतात. आज सकाळी ८ वाजता स्व.भास्कररावजी शिंगणे साहेब स्मृती ज्योतीचे आगमन दुसर बीड येथील जिजामाता कारखाना गेटजवळ झाले. 

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इरफानअली शेख, जि.प.सदस्य पंडितराव खंदारे,सरपंच प्रकाश सांगळे, उपसरपंच तौफिक शेख, ग्रां.प.सदस्य बाबुराव खंदारे, डॉ.शरदराव मखमले, अशोकराव जाधव, टि.एन.मोगल, वामनराव जाधव, शिवाजी खरात, विक्रम काळे, दिलावर शेख, सुधीर निकम, अमीर पटेल, पांडुरंग देशमुख, गजानन काळे, गजानन जगताप, अबरार शेख, दिलीप आतार, व्हि.आर.बनकर, निळकंठ जाधव, नौशाद शेख, अय्युब शेख, कुलाल अण्णा, दिनकर सांगळे, शेषराव नागरे, नय्युम शेख, अब्दुल अलीम, शारिक देशमुख, निहाल खान, असद खान, प्रा.आबेद शेख यांच्या सह सर्वपक्षीयांनी आदरांजली अर्पण केली.




  

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler