पोर्ला वनपरीक्षेत्रातील चुरचुरा बिटातील अवैध वृक्ष तोडीची चौकशी दडविणाऱ्या चौकशी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून दोषी वनरक्षक व वनपाल याना तात्काळ निलंबित करा,,
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन यांची निवेदनातून मागणी,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे9421318021
वडसा वनविभागात पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचुरा बिटातील राखीव जंगलात महिना भरापूर्वी अंदाजे 40 एकर जंगल वनविभागाच्या लोकांना हाताशी घेऊन काही गुन्हेगारांनी अवैध वृक्षतोड केली व वन संपत्ती नष्ट केली, करोडो रुपयांची जंगलाची हानी झाली,
चुरचुरा या गावातील लोकांनी व काही सामाजिक संघटनांनी याची चौकशी करावी या संदर्भात निवेदन सादर केली,वन कर्मचारी व गुन्हेगार याना या प्रकरणी थातूर मातूर चौकशी करून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना असा संशय नाकारता येत नाही,
येत्या दहा दिवसात संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन केल्या जाईल असे निवेदन याप्रसंगी देण्यात आले,
धर्मवीर सालविठ्ठल उपवनसंरक्षक वडसा यांना निवेदन देताना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे जिल्हा संघटक विजयखरवडे,
जिल्हा संपर्क प्रमुख योगाजी कुडवे,जिल्हा उपाध्यक्ष रमेश बांगरे अमोल मेश्राम,अनिल कोठारे,नाणाजी ठाकरे,रवि कावळे,शुभम खरवडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते,