पालकमंत्री नाम. विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरित
ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि
मनोज अगळे 9765874115
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सदर कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा या हेतूने सदर कुटुंबाला शासनाच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात येते.
त्याअनुषंगाने ब्रम्हपुरी तालुक्यातील 25 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या आर्थिक धनादेशाचे वितरण करण्यात आले.
सोबतच बोडधा येथील वीज पडून ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना सुध्दा 4 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत-पुनर्वसन बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सदर धनादेशांचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.
यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य प्रमोद मोटघरे, जि.प.सदस्य डाॅ.राजेश कांबळे, जि.प.सदस्या सौ.स्मिताताई पारधी, पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर, तहसीलदार उषा चौधरी, किसान काॅंग्रेस सेलचे नानाजी तुपट, मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालीका सुचित्राताई ठाकरे यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत तळोधी खुर्द येथील ज्योती एकनाथ सपाटे, लाडज येथील बेबी लोमेश ढवळे, पातळी गणेशपूर येथील सरीता अमीत चहांदे, सायगाटा येथील शितल अशोक धोंगडे, खेडमक्ता येथील सुमन कृष्णा मेश्राम, निलज येथील निर्मला ललीत चौधरी, चौगान येथील माया महादेव दर्वै, माहेर येथील कविता विजय शेंडे, एकारा येथील अश्विनी रघुनाथ कोराम, वायगाव येथील शैला छबीलाल मेश्राम, रणमोचन येथील सुदर्शना भाऊराव मुनघाटे, कुर्झा येथील कुसुम मुखरू दिघोरे, सोनेगाव येथील कवीता दामोधर दर्वे, ब्रम्हपुरी येथील अर्चना राजेश्वर ठेंगरी, बल्लारपूर माल येथील भुमीका राजेंद्र इटणकर, बोंडेगाव येथील रुषी बकाराम राऊत, माहेर येथील रमाबाई ब्रम्हदास नागदेवते, बोंडेगाव येथील संगीता महादेव बेदरे, दुधवाही येथील वेजंता विलास राऊत, रूई येथील वंदना नानाजी ठाकरे, कूर्झा येथील मंजुळा महादेव रामटेके, ब्रम्हपुरी येथील मंदा नरेंद्र कावळे, संघप्रिया राहुल उरकूडे, चांदली येथील शशीकला राजेश बारसागडे, कळमगाव येथील सुनंदा दादाजी भोयर या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले