शहरातील मुत्रीघर व संडास ची दुरावस्था,नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष नगरसेवक कुंभकर्ण झोपेत .

 शहरातील मुत्रीघर व संडास ची दुरावस्था,नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष नगरसेवक कुंभकर्ण झोपेत .

गडचिरोली प्रतिनिधी संदीप कांबळे 9421318021

गडचिरोली शहरात जुने 5 व नवीन 11असे एकूण 16 सार्वजनिक मुत्रीघर व संडास आहेत, नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या 23 वार्डात जवळपास आजपर्यंत एका वार्डात एक या प्रमाणे 23 सार्वजनिक मुत्रीघर व संडास असायला पाहिजे होते पण कार्यशील व कर्तृत्ववान नगर सेवकाने ते काम करून आपापल्या वार्डात लोकांना सेवेकरीता ते काम केले,

व बऱ्याच नगरसेवकाने बघ्यांची भूमिका घेतली व ते काम करण्यास मागे राहिले, पण जिथे काम झाली आहेत त्या सार्वजनिक मुतारी व संडास ची नियमितप्रमाणे साफसफाई होत नाही, कुणी तेथे गेला तर खरा खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या दिसतात ,तर काही ठिकाणी पाण्याची पण सोय नाही,

ही जनहीताची कामे केवळ नगर सेवकांना उभी करून पैसा कमविण्याचे साधन तर झाले नाही ना असा प्रश्न पळत आहे,

गडचिरोली शहरातील नगरसेवक केवळ नावपूरतेच आहेत तर काही नगरसेवक आपल्या टक्केवारीत गुंग आहेत,त्यांना साफसफाई काय असते याची जाणीव सुद्धा नाही,

   वरील झालेल्या संडास व मुत्रीघरांची दुरवस्था नगर परिषद प्रशासनाने लवकरात लवकर करावी ,नाहीतर जनतेला वेळ प्रसंगी नगर परिषद पुढे आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही,



      

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler