ग्रा, प, कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना दिले निवेदन

ग्रा, प, कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना दिले निवेदन


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे


ग्रा प कर्मचारी संघटना नी दिले निवेदन

प्रतिनिधी नेरी।चिमूर पंचायत समितीअंतर्गत बऱ्याच ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचे मागिल काही महिन्यापासून शासन वेतनाचे अनुदाना व्यतिरिक्त ग्राम पंचायती हिश्याची वेतनापोटी देय असलेली उर्वरित पन्नास टक्के रक्कम व राहणीमान भत्याची रक्कम तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम दिलेली नाही ग्राम पंचायती सचिव (सर्व) वेतन व इतर लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे तेव्हा  ग्रा प कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात आहें तालुक्यातील सर्व ग्रा प कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी वेतन अनुदान मिळवून द्यावे आणि ग्रा प कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडवाव्यात याकरिता चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार यांना ग्रा प तालुका कर्मचारी संघटनेकडून दि 29 ऑक्टोबर ला निवेदन देण्यात आले आहे   

                 मागील कोरोनाची भीषण  परीस्थित यात ग्रा प कर्मचारी यांनी जीवाची पर्वा न करता  बेधडक कामे केली तसेच गावस्तरावरील संपूर्ण कामे त्यात पाणी स्वच्छता माहिती देवाण घेवाण कार्यालयीन असे अनेक कामे करून सुद्धा  येवढे निस्वार्थ काम करूनही सचिव किंवा ग्रा प त्यांचे वेतन अदा करीत नाही तेव्हा   ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्व सानुग्रह अनुदान राशी व मागील काही महिन्याचे शासन वेतनाचे अनुदाना व्यतिरिक्त ग्राम पंचायतीची हिश्याची वेतनापोटी देय असलेली उर्वरित पन्नास टक्के रक्कम व राहणीमान भत्याची रक्कम तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम तक्ताळ अदा करण्यात यावी तसेच नवीन वाढीव वेतन अनुदान अदा करण्यात यावे. ह्या अनेक मागण्यांसाठी  तालुका ग्रा प कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल गावतुरे सचिव किशोर कामडी यांच्या नेतृत्वाखाली  आ बंटीभाऊ भांगडीया  यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे सदस्य दीपक लांजेकर भीमराव गुरनुले विपीन गराटे कृष्णा ढोले घनश्याम लोथे जावेद शेख  उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler