खुंटाळा ग्रामपंचायतीने बांधला वनराई बंधारा

खुंटाळा ग्रामपंचायतीने बांधला वनराई बंधारा


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे


पावसाळा संपला, नदी नालेही आटत चालले. शेतीची कामे मात्र फेब्रुवारी-मार्च पर्यंत चालणार आहेत. तो पर्यंत चालणाऱ्या शेतीच्या कामासाठी परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा शोध घ्यावा लागू नये, शिवाय गुऱ्हाढोरांनाही पाण्याच्या शोधात इतरत्र कुठेही भटकावे लागू नये, एवढेच नाही, तर उन्हाळ्यात सुध्दा जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पंचायत समिती चिमुर च्या   सुचनेनुसार  नेरी वरून जवळ असलेल्या खुंटाळा  ग्रामपंचायतीने जंगलालगत असलेल्या आणि शेती शिवारात परिसरातील पाणी वाहत असणाऱ्या  नाल्यावर वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली आहे. या कामात गावकऱ्यांनी सुध्दा सहभाग नोंदवून श्रमदान करीत ग्रामपंचायतीला सहकार्य केले. 

              यावेळी कृषी सहायक येसनकार कृषी सहायक रंदये सरपंच कु.मृणाली बोरकर, उपसरपंच   

श्री.विनोद बारसागडे,तुलाराम बारसागडे,सुधाकर सोनवणे,अरमान बारसागडे,ग्रामपंचायत सदस्य श्री.किशोर जांभूळे,गुणवंता गायकवाड,गंगाधर श्रीरामे, सुनील चौधरी, आनंदराव चौधरी,कोमल श्रीरामे,अतुल शेन्डे,शेतकरीवर्ग  उपस्थित  होते तसेच ,नितेश श्रीरामे,अश्विन जांभूळे ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावकऱ्यांची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler