आई द्या मज आई द्या सतरा महिन्याच्या बाळाचे आई साठी आर्त हाक.

आई द्या मज आई द्या सतरा महिन्याच्या बाळाचे आई साठी आर्त हाक. 

पोलीस यंत्रणा बाळाच्या आईला शोधण्यात .जोरदार प्रयत्न सुरू परिसरातील व गावातील नागरिकांचे हृदय गहिवरले


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे



चिमूर तालुक्यातील गोरवट येथील एक हृदयदावक घटना,  गोरवठ येथील शिलास रामटेके हा अत्यंत साधा होतकरू तरुण, परिस्थिती अतिशय गरीबी, याच परिस्थितीत 2017 ला त्याचे लग्न शेगाव खुर्द येथील शीतल शी झाले, मोट्या आनंदात त्याचे संसार सुरू असताना त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक फुल फुलले त्याचे नाव सक्षम ठेवले गेले,  मोठ्या आनंदात संसाराचा गाळा चालत असताना त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट् लागली आणी सक्षम 17 महिन्याचा असतांना बाळाची आई शितलने शेतावर जातो म्हणून घरून निघून गेली मात्र अजूनपर्यंत परत आलीच नाही.  

                   तिचा सतरा वर्षाचा चिमुकला  बाळ आई येईल, आता येईल, नंतर येईल या आशेत टोहो फोडत रडत आहे परंतु बाळाची ही केविलवाणी हृदयाला पाजर फोडणारी आर्त हाक सुद्धा त्या निष्ठुर आईपर्यंत पोहचत का नाही ?.

               -- वासराच्या आवाज एकताच गाय हंबरडा फोडीत वासराच्या जवळ येते , आपल्या पिल्याला कुरवाळते, परंतु  बाळाला सोडून निघून जाणारी माता न वैरीण असावी  असल्यासारखी चिमुकला बाळ आई साठी टोहो फोडत असतांनाही मात्र बाळाच्या भेटीला आली नाही. 

                     बाळ ''मला आई द्या आई'' म्हणून रडून आर्त हाक मारीत आहे परंतु बाळाची ही हाक आईपर्यंत पोहचत नाही आहे . त्यामुळे हा बाळ आई , विना पोरका झाला आहे.  बाळाची आई शीतल ही बाळाला टाकून शेतावर जातो म्हणून घरातून निघून गेली ती परत आलीच नाही तेव्हा नातेवाई मित्र मंडळी इकडे तिकडे शोध मोहीम राबविली परंतु  शितलचा ठावठिकाणा लागला नाही त्यामुळे लगेच शिलास रामटेके यांनी 14 सप्टेंबर ला पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दिली.  परंतु आजतागायत शीतल चा शोध सुद्धा लागला नाही आणि पोलिसांना सुद्धा तिचा शोध लावण्यात यश प्राप्त झाले नाही तरी पण पोलीस यंत्रणा बाळाच्या आईला शोधण्यात .जोरदार प्रयत्न सुरू असून तपास करीत आहेत. 

वडील शिलास रामटेके हे कसे तरी बाळाचे संगोपन करीत आहेत पण हे 17 महिन्याचे बाळ आईसाठी केविलवाणा होऊन रोज टोहो फोडत आहे त्याची ही आईसाठी केविलवाणी हाक पाहून गावकरी व शेजाऱ्यांचे सुद्धा मन भारावून गेले आहे या बाळाच्या आर्त हाकेने सर्वांच्या काळजाला घायाळ कले आहे.

        तेव्हा पोलीस विभागाने जोरदार शोध मोहीम राबवून शितलचा शोध घ्यावा असे आवाहन बाळाचे वडील शिलास रामटेके करीत आहेत कारण  सक्षम आईसाठी व्याकुळ होऊन  वाट पाहत आहे केविलवानी हाक मारत आहे मला आई पाहिजे मला आई द्या त्याची ही करून हाक त्याच्या आई पर्यंत पोहचते की नाही हे ईश्वरालाच माहीत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler