पेट्रोल व डिझेल दरवाढी च्या निषेधार्थ युवासेनेची सायकल रॅली
वरोरा तालुका प्रतिनीधी
गणेश उराडे 8928860058
शंभर सायकली व 4 बैलगाडी सह शेकडो युवासेना कार्यकर्त्यांच्या रॅलीने वरोरा शहर दुमदुमले
वरोरा :-पेट्रोल,डिझेल,दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.काही बेरोजगारांनी रोजगारासाठी कर्जावर चारचाकी वाहने घेतली आहे,परंतु पेट्रोल,डिझेल च्या अवाजम दरवाढीमुळे वाहने घरी ठेवण्याची पाळी आली आहे.
युवासेनेतर्फे दरवाढ कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे विरोधात राज्यव्यापी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून,युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांच्या नेतृत्वात वरोरा-भद्रावती मतदार निर्वाचन क्षेत्रात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
31 ऑक्टोम्बर ला 100 सायकल व 4 बैलबंडीसह ,शेकडो कार्यकर्त्यासंमवेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली.आणि रॅली जाजू हॉस्पिटल चौक भ्रमण करीत ,शहिद स्मारक चौक येथे समारोप करण्यात आला.अभूतपूर्व रॅलीने वरोरा शहर दुमदुमले.
सायकल रॅलीत युवासेना कार्यकर्त्याने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते,तालुका प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी रॅलीत सहभाग घेऊन पेट्रोल,डिझेल दरवाढ हि केंद्र सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे अवाजम महागाई वाढली आहे.आपल्या हक्कासाठी जनतेनी महागाईचा निषेध करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य ठरते.आणि न्याय हक्क मिळवून घेण्याचा अधिकार सुद्धा प्रत्येक भारतीय नागरिकांना आहे.असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते व युवासेना उपजिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांनी आपल्या प्रतिक्रिया विषद केल्या.रॅलीमध्ये शुभम टोरे, महेश जीवतोडे,दिनेश यादव यांची उपस्थिती होती.