वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- तालुक्यातील शिवसेनानेते मनिष जेठणी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गरजूं विद्यार्थ्यांना मदतिचा हात देत जेवण, राहण्याची व्यवस्था केली
गरजूं व्यक्तीपर्यंत खरी मदत पोहोचली पाहिजे याभावनेतून दि30ऑक्टोबर ला
शनिवारी रात्री थंडीमध्ये कुडकुडत असलेल्या विद्यार्थ्यांची केली
शनिवारी रात्री यवतमाळ जिल्ह्यातुन सात विद्यार्थी आरोग्य विभागाच्या भरती साठी वरोरामध्ये आले होते. रात्र झाल्याने वरोरा शहरातच मुक्काम करन्यासाठी ठिकाण शोधू लागले, गरीब परिस्थिती असल्याने जेवणाची व राहण्याची व्यवस्था कशी करावी या विवंचनेत असतांना शिवसेनेचे नेते मनिष जेठणी यांनी त्यांना मदतीचा हात दिला,रात्र असल्याने स्वतःच्या घरी स्वयंपाक बनवून या विद्यार्थ्यांना पोटभर जेउ घातले यानंतर त्यांच्या राहण्यासाठी चांगली व्यवस्था अंबादेवी देवळात करून दिली. या सात विद्यार्थ्यांनी या देवरूपी माणसाचे आभार मानले आणि चिमूर येथील आरोग्य विभागाच्या भरती साठी रवाना झाले.
या मदत कार्यास सुनील दुगड प्रवीण सुडाणा, फाळके सर यांनी अंबादेवी मंदिर ट्रस्ट चे आभार मानले.