पालकमंत्री नाम.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षातील अनेक महीलांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश
ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि
मनोज अगळे 9765874115
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ब्रम्हपुरी शहरातील शिवसेना पक्षातील अनेक महीलांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
पक्षप्रवेशाचा सदर कार्यक्रम ब्रम्हपुरी शहरातील शासकीय विश्रामगृहात पार पडला. यावेळी पालकमंत्री नाम विजयभाऊ वडेट्टीवार यांनी व उपस्थित मान्यवरांनी सदर महिलांना पक्षाचे दुपट्टे घालून त्यांचे यावेळी स्वागत केले.
यावेळी बोलतांना नाम. विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले की, काॅंग्रेस पक्षात पक्षप्रवेश केलेल्या सर्व महिलांचे स्वागत असुन अडचणीच्या काळात एक तुमचा भाऊ म्हणून आपण सदैव आपल्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जि.प. सदस्य डाॅ. राजेश कांबळे, जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, जि.प. सदस्या सौ. स्मिताताई पारधी, पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक डाॅ. नितीन उराडे, युवक काँग्रेसचे ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगलाताई लोनबले, महिला काॅंग्रेसच्या शहर अध्यक्षा योगीताताई आमले यांसह अन्य मान्यवर यांची उपस्थिती होती.
पक्षप्रवेश केलेल्या महिलांमध्ये शिवसेनेच्या तालुका संघटीका सौ. जयाताई भगवान कन्नाके, शिवसेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ. विनाताई राम घोडपागे, शहर संघटीका सौ. निर्मलाताई राउत, शहर उपसंघटीका सौ. सुरेखा ताई पारधी, श्रीमती हेमलता सलामे, सौ. चांदणी सुरपाम, सौ. उषा उईके, श्रीमती पुजा शेळमाके, सौ. पद्मा आरडे, सौ. शोभा आत्राम, सौ. कल्पना तुपट, श्रीमती सुंदराबाई करंबे, श्रीमती राधाबाई बावनकुळे, सौ. चंदाताई जांभुळकर, अश्विनी बावनकुळे, चंदाताई राजुरीया, अरुणाताई खेळकर यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मैंद यांनी केले.