ब्रम्हपुरी तालुका कांग्रेस कमेटी कार्यालयात भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांचा पुण्यतिथी कार्यक्रम व सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती संपन्न
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधि
मनोज अगळे 9765874115
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, आयर्न लेडी, भारतरत्न, प्रियदर्शनी स्व. इंदिरा गांधी यांचा पुण्यतिथी कार्यक्रम व सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज दि. ३१ आक्टोंबर रोजी रविवारी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवर यांनी स्व. इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी सदर कार्यक्रमाला ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, प्रा.डाॅ. देविदास जगनाडे, जि.प. सदस्य डाॅ. राजेश कांबळे, जि.प. सदस्य स्मिताताई पारधी, पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे, चिमुर विधानसभा ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष काशीनाथ खरकाटे गुरूजी, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगलाताई लोनबले, सेवादलाचे विठ्ठल गुड्डेवार, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, माजी सभापती नेताजी मेश्राम, प्रल्हाद सहारे, भीमराव वंजारी, पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, ब्रम्हदेव दिघोरे, सुधा राऊत यांसह अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.