तालुक्यातील संपुर्ण राशन दुकान व केरोसिन दुकानांची चौकशी करून दोषी दुकानदार यांचे परवाना रद्द करण्यात यावे, व दोषी अधिकारी ,कर्मचारी यांचे वर निलंबनाची ची कार्यवाही करावी,
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन जिल्हा गडचिरोली यांनी दिला निवेदनातून इशारा,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे9421318021
दि,18/10/2021 रोजी मा.ना. छगनजी भुजबळ साहेब अन्न पुरवठा व नागरी पुरवठा मंत्री हे गडचिरोली च्या दौऱ्यावर आले असताना त्यांना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन गडचिरोली च्या वतीने निवेदन देण्यात आले,
गडचिरोली तालुक्यात राशन दुकानात अविवाहित मुलांचे अन्तोदय चे राशन कार्ड आहेत, तसेच तालुक्यातील संपुर्ण केरोसीन दुकानात ज्यांच्या नावाने केरोसीन येतो त्यांना केरोसीन न देता, काळ्या बाजारात डबल किमतीला विकल्या जाते हे सर्व प्रकार पुरवठा निरीक्षक व पुरवठा अधिकारी यांना माहित आहे यात साखळी पद्धती चा भ्रष्टाचार सुरु आहे,गडचिरोली तालुक्यातील संपुर्ण राशन दुकान व केरोसिन दुकान ची चौकशी करून दोषी दुकानदार यांचे परवाना रद्द करण्यात यावे, व दोषी असणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे
अन्यथा तहसील कार्यालय गडचिरोली समोर तीव्र आंदोलन करणार,अश्या पद्धतीचे
निवेदन देन्यात आले,
निवेदन देते प्रसंगी योगाजी कुडवे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जिल्हा संपर्क प्रमुख ,धनंजय डोईजड ,चंद्रशेखर सिडाम उपस्थित होते.