माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत लोकमान्य महाविद्यालयातर्फे वृक्षारोपण
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- लोकमान्य महाविद्यालय वरोरा येथे दि.१३ ऑक्टोबर २०२१ ला माझी वसुंधरा अभियानांतर्गत रा.सो.यो. स्वयंसेवकांनी वृक्षारोपण करून ई- शपथ घेतली. तसेच प्रमाणपत्रही त्यांना प्राप्त झालेत. स्वयंसेवकांनी परिसर स्वछता देखील केली. या कार्यक्रमाला स्वयंसेवकासह प्राचार्य डॉ.एस.के.सिह कार्यक्रम अधिकारी डॉ.जयश्री शास्त्री सहकार्यक्रम अधिकारी डॉ.दीपक लोणकर तसेच महाविद्यालयातील अन्य प्राध्यापक कर्मचारी सहभागी झाले. महाविद्यालयाचे ई- प्रमाणपत्र ही प्राप्त झाले. एकूण ४० संख्या या कार्यक्रमाला होती.