गडचिरोली-चामोर्शी महामार्ग कामाला आली गती,
महामार्गाचे काम करणारी दोन अवजड यंत्र चामोर्शी रोड ला दाखल,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे 9421318021
दि. 9 ऑक्टोबर रोजी खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्राजी, महामार्गाचे कंत्राटदार किशोर गायकवाड व अन्य अधिकारी उपस्थित होते,त्याचीच फलश्रुती आजपासून कामाला सुरुवात झाली,काम करणारे मजूर रात्रभर काम करताना गडचिरोली चामोर्शी राज्य मार्गावर दिसत आहेत,राज्य मार्गाचे काम आतातरी लवकरात लवकर व्हावे अशी आशा गडचिरोली वासीयांना वाटत आहे, कंत्राटदार काम पूर्ण करतो की नाही हा गडचिरोली वासीयांना कुतूहलाचा विषय वाटत आहे,
काही का होईना पण आज शहरात कामाला सुरुवात झाली हे नक्की,राज्यमार्ग पूर्ण लवकरात लवकर व्हावा या प्रतीक्षेत जनता आहे,जेणेकरून वाहन चालवताना होणारा त्रास होणार नाही,