प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथे कोविड लसीकरण वाहन व रुग्णवाहिके चे थाटात उदघाटन
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथे आज लसीकरण वाहन आणि नवीन रुग्णवाहिकेचे थाटात उदघाटन करण्यात आले जिल्हा स्थानिक निधीतून या रुग्णवाहिका पालकमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आल्या या रुग्णवाहिकेचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य डॉ. आसावरी देवतळे पंचायत समिती सदस्य पपिता गुळघाने पंचायत समिती सदस्य वंदना दाते डॉ. सोनाली कपूर सरपंच गणेश मडावी उपसरपंच अमित बहादूरे प्रहार सेवक गणेश उराडे माजी उपसरपंच पुरुषोत्तम कुडे वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष देवतळे, डॉ. मृणाली अवचट तसेच कर्मचारी आणि गावकऱ्यांच्या उपस्तिथीत पार पडला